Sunday, December 22, 2024

सिंगापूर मलेशिया थायलंड

 *सहलीच्या पहिल्या दिवसाचा प्रवास*


नाशिक ते मुंबई विमानतळ दुपारी १२ वाजता टॅक्सीने सहलीचा शुभारंभ श्री क्षेत्र नाशिकहून श्री व सौ नागोरी यांच्या सह आरंभ झाला. प्रवासादरम्यान नाशिकचे निसर्गरम्य वातावरण मागे टाकत आमची गाडी मुंबई विमानतळाकडे धावत होती. रस्त्यावरील खड्डे जाणवत असले तरी हळूहळू उत्साह व उत्सुकता वाढत होती आणि सहलीसाठीची चर्चा सुरू झाली.


मुंबई ते सिंगापूर विमान प्रवासासाठी 

मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर विमानतळाची प्रशस्ता अनुभवत काही क्षण मोबाईल फोन मध्ये कैद केले. टुर आयोजकांनी नाश्त्यासाठी पाकिटं, लेबल्स, विसा, पासपोर्ट व तिकिंटाबरोबर सूचनांचे पार्सल दिले. 


नंतर चेक-इन प्रक्रिया पूर्ण केली आणि विमानप्रवासाची वाट पाहू लागलो. सिंगापूरच्या दिशेने विमान उड्डाण करताच सहलीची खरी मजा सुरू झाली. सिंगापूर एअर लाइन्सचं भलं मोठं ३८८ आसनं असलेलं डबल डेकर विमानात पहिल्यांदाच बसून प्रवास होता. प्रवासादरम्यान विमानातील हवाई सुंदरी यांनी दिलेल्या भोजनाचा आस्वाद घेत सिंगापूरची स्वप्नवत झलक पाहण्याची उत्सुकता डुलकी येऊ देत नव्हती होती. ४०००० फुट उंची वर ९०० ते १००० किमी वेगाने विमान ४०७६ अंतरावर असलेल्या सिंगापूर कडे झेपावत होते. साडेचार ते पाच तासांच्या प्रवासात समोर असलेल्या छोटेखानी स्क्रीनवर सर्वं माहिती दिली जात होती.


सिंगापूर ते बँकॉक विमान प्रवास

सिंगापूर विमानतळावर अल्प थांबा घेतल्यानंतर बँकॉकसाठी दुसऱ्या टर्मिनल मधून दुसऱ्या विमानात स्थानापन्न झालो. हा प्रवासही तितकाच आरामदायी आणि आनंददायी होता. बँकॉकच्या दिशेने जाताना आंतरराष्ट्रीय प्रवासाचा थरार अनुभवला.


*बँकॉक ते पटाया बस प्रवास*


बँकॉक विमानतळावर पोहोचल्यावर आमची बस पटाया शहराकडे निघाली. बँकॉकच्या गजबजलेल्या शहरातील झगमगत्या रस्त्यांवरून प्रवास करताना थायलंडच्या संस्कृतीची ओळख होत होती. रस्त्यात निसर्गसौंदर्य, नारळाची विशेषत: पामची झाडे, आणि हिरवळ पाहून मन प्रसन्न झाले. दुपारी टायगर रेस्टॉरंट मध्ये भोजन घेऊन वाघांना विविध प्रकारच्या फोटोग्राफीचा जसा सेल्फी वगैरे आनंद दिला. पटायामध्ये पोहोचताच अलकाझारच्या विस्तृत सभागृहात तेथील थाई संस्कृती दर्शविणाऱ्या नृत्य संगीत यांचा आस्वाद घेत २४ तासांच्या प्रवासाचा क्षिण घालवला. शब्द जरी उमगत नव्हते तरी त्यांची भडक वेशभूषा व नृत्यांगनांची अदा मन मोहून बरंच काही सांगून गेली. 


आमच्या पहिल्या दिवसाचा प्रवास यशस्वीरीत्या संपन्न झाला.


विशेष टिपणी


संपूर्ण प्रवासाने थकवा जाणवला तरी उत्साह मात्र कायम होता. पुढील दिवसाच्या साहसाची कल्पना मनात रेंगाळत होती!

[12/13, 16:58] Omprakash Sharma: *सहलीचा द्वितीय दिवस*


टिम लिडर अवनीच्या सूचनेनुसार सकाळी पाच वाजता उठून पटाया शहर बघण्यासाठी पटापटा तयार होऊन सकाळच्या न्याहरी साठी जमा झालो. हाॅटेल अत्याधुनिक सोयीसुविधा युक्त असे होतं. न्याहरी / ब्रेकफास्ट साठी थाई व्यंजना बरोबर भारतीय व्यंजने उपलब्ध होती. आमची लोकल गाईड मिस पेड बस सह हजर झाली. 


बसमध्ये स्वार होताच मिस पेड ने 'अरुण सव्वा' म्हणजे सुप्रभात ह्या थाई वाक्याने स्वागत केले. थायलंड तसं बुद्धिष्ठ देश ९० ते ९५ टक्के लोकं बुद्ध धर्म पाळतात. महिला वर्ग तर एकूण लोकसंख्येच्या ६० ते ६५ टक्के म्हणूनच प्रत्येक ठिकाणी महिला वर्गाची उपस्थिती जाणवतेय, हाॅटेल व्यवस्थापनापासून तर चपराशी पर्यंत. कामात कुचराई केली आहे असं आढळलं नाही. आमच्या चमूत ही महिला ७० टक्के होत्याच. पुणे येथून आलेल्या ७ भगीनी गृप सेवन सिस्टर म्हणून ओळखला जायचा. असो,


आम्ही सर्वं आता पटाया शहरातील सर्वात उंच ५५ मजली इमारतीच्या गच्चीवर लिफ्टने पोहोचलो. तेथून पुर्ण पटाया शहर दर्शन देत होते. वरुन स्काय वॉक वा जंप करुन खाली जाणे हे हिंमत व धैर्य लागणारी गोष्ट होती. आमच्या पैकी ८ ते दहा लोकांनी हे शौर्य दाखवले. जवळपास ६०० फुटांवरून खाली जायचं होतं. 


हे साहस घेऊन आम्ही सर्वं बसने पटाया शहरातील पॅरा ग्लायडिंग व अंडर सी वाकींग साठी तयार केलेल्या डेक वर स्पिड बोटीतून निघालो. हिरवा गार समुद्र व थंड हवा मनाला सुखद अनुभव देत होती. जितक्या वेगाने पाणी कापत बोट पळत होती तितक्याच वेगाने सर्वांचीच फोटोग्राफी करुन ते क्षण मोबाईल फोन मध्ये कैद करण्यासाठी लगबग चालू होती. 


डेकवर पोहचल्यावर पॅरा ग्लायडिंग साठी असलेला सूट अर्थात सेफ्टी जॅकेट घालून तयार झालो. दहा ते पंधरा सदस्य गण भय मिश्रित आनंद घेणं व शौर्य दर्शविण्यासाठी तयार होते . माझा नंबर येताच काही सेकंदात पॅराशूट कधी हवेत गेले कळलेच नाही. आणि मनातील भीती पळून गेली. समुद्राच्या वर आकाशात जवळपास १०० फुटी उंचीवरून हवेत तरंगण्याचा आनंद काही औरच होता. खाली हिरवा गार समुद्र व एखाद्या पक्ष्याप्रमाणे गगनभरारी मनाला सुखद आनंद व प्रसन्नता देत होती. ५ ते दहा मिनिटांचा हवेत तरंगण्याचा आनंद काही वेगळाच होता. वयाच्या अवघ्या ६९ व्या वर्षी असा आनंद अनुभवणारा कदाचित मीच होतो हे जास्त सुखद होते. 


*आकाशाला गवसणी घालता,*

*वाऱ्याच्या साथीने गगन गाठले*

*पॅरा ग्लायडिंगच्या हर्षातून,*

*जणू जग हे जिंकले*!


तसेच अंडर सी वाकींग साठी तयार झालो. समुद्राच्या तळाशी जाऊन तेथील विविध प्रकारचे रंगीबेरंगी मासे बघताना निसर्गाच्या किमिया जादू लक्षात आली. हातातील ब्रेडचा चुरा सोडताच शेकडो मासे जवळ येतात. आपण एका वेगळ्या समुद्र पोटातील विश्वाचा अनुभव घेत असतो. 


बोटीच्या तळाशी असलेल्या काचेतून मासे बघण्यापेक्षा हा एक अनुभव निराळा आनंद देऊन गेला.


समुद्राच्या किनाऱ्यावर बसून नारळाच्या पाण्याचा आस्वाद घेत फोटोग्राफीची लयलूट केली. जीन्स टी शर्ट, हॅट घालून समुद्र किनाऱ्यावर ऐटीत 


No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...