Quotes









 











🌹 सुप्रभात 🌹

दि.२८-०३-२०२१

उषाराणीचा आगमन सोहळा
उजवतोय भास्करराजा
प्रकाशाच्या प्रथम किरणांनी
निसर्ग होतोय तरोताजा

©ॐप्रकाश शर्मा



🌹🌹 *सुप्रभात* 🌹🌹

नव नवलाईचे रंग उधळत
येते आदित्याची स्वारी
सडा समार्जन करून अंगणी
सुबक रांगोळी काढली द्वारी


© *ॐप्रकाश शर्मा*


सकाळ प्रत्येक वृक्षांला
सजीवन घेऊन येते
सकाळ प्रत्येक पक्ष्याला
एक ऊर्जा देऊन जाते

सकाळ प्रत्येक फुलात
ताजगी शिंपडून जाते
सकाळ प्रत्येक क्षणात
चैतन्य भरभरून जाते

©ॐप्रकाश शर्मा


जागतिक कविता दिवस 


आपल्या मनातील भावनांनी 
उभे करतात एक विश्व रंगवून
अलंकारांनी सजवून कविता
फुलवतात शब्दात  शब्द  गुंफून


🌹 अशा सर्व कवि कवियत्री यांना जागतिक कविता दिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा🌹©ॐप्रकाश शर्मा


🌹🌹 सुप्रभात 🌹🌹

आयुष्यातील वळणावर
नका पाहु मागे वळून
ठेवा दृष्टी पुढील वळणावर
नाहीतर जाईल ध्येय पळून

©ॐप्रकाश शर्मा 


वसुंधरेवर पसरली किरणे
प्रभाकराच्या हृदयातील
पांखरे पंख पसरवून पसार
झाली झेप घेण्या नभातील

उंच उडावे घेऊन उडान 
साकार कराया स्वप्न महान

#ॐप्रकाश शर्मा
🌹🌹🌹🌹🌹














































































































































No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...