लेखणी
शब्द वाक्य ओळी पाझरतात लेखणीतून
कथा लेख कविता आकारतात लेखणीतून
भावना विचार कल्पना अवतरतात शाईतून
कवी लेखक जन्माला येतो लेखणी शाईतून
कृष्णाची भक्तीगीतं वाहते ह्या लेखणीतून
ज्ञानेश्वरी अवतरली ज्ञानेश्वरांच्या लेखणीतून
व्यासांचे महाभारत गणेशांच्या लेखणीतून
रामायण लिहिले वाल्मिकीच्या लेखणीतून
शिवरायांच्या तलवारीची धार
तानाजीच्या दांडपट्ट्याचा वार
कळले ह्या लेखणीतून
समर्थांच्या दासबोधातील सार
लोकांच्या विविध वादावादीत
न्यायाधिशांची लेखणी करते शिक्षा
संसाराच्या कठीण आपाधापीत
संतांची लेखणी देते भक्तीची दिक्षा
पत्रकार बंधुंच्या निरपेक्ष लेखणीतून
समाजातील ज्वलंत प्रश्नांना फुटते वाचा
माणूसकी निर्माण होईल अशी लेखणी
साच्यात तयार होईल का कुण्या कंपनीच्या
No comments:
Post a Comment
Thanks for the comments