विषय - टिपूर चांदण
चंद्राच्या साक्षीने
गुणगुणत निघाले गंधाळलेले वारे
रातराणीच्या सुगंधात
टिपुर चांदणं माळून तारे
लाजेने लाल होवून
नभा आड लपली चांदणी
अबोल तिच्या सौंदर्याचे प्रणव गुंजन ऐकूनी
अबोल ओठांवर ओठ भाव
मनीचे सांगत शहारले
किंचित खुले नयन भाव
प्रितीचे व्यक्त करु लागले
बाहुपाशात घट्ट तिच्या
उसळल्या स्पर्शाने ज्वाला
प्रितीच्या स्वर्ग
सुखात न्हाऊन मनी वसंत प्रेमाचा फुलला
निशा राणीच्या मंद
प्रकाशात झालो सौंदर्याने अधीर
मदिरालयात तिच्या
उसळून झालो धुंद नशेने बधीर
प्रेम मय मिठीत तिच्या
लय बद्ध हृदयाचा झंकार आहे
टिपूर चांदण्याचा
संगीतात श्वासाचा सुंदर ताल आहे
No comments:
Post a Comment
Thanks for the comments