Monday, April 5, 2021

आर्त साद

 आर्त साद


सांग मनात काय आहे तुझ्या

प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे


तुझ्या मनातल्या भावना अलगद

हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे


सून म्हणून जरी आलीस तु

मुलगी म्हणून रहा सुखात इथे


आयुष्यातील तुझ्या यशासाठी

आशिषाचे  हात शिरावर ठेवु दे


तान्हेल्या तुझ्या लाडक्या पोराला 

अंगा खांद्यावर आमच्या खेळु दे


नको शिरा नको श्रिखंड पुरी 

दाळभात वा खिचडी खावु दे


डोळे भरून येतील तुझे तेंव्हा

मायेच्या पदराने माझ्या पुसू दे


सांग मनात काय आहे तुझ्या

संध्याछायेचा गारवा लाभू दे


साठवणीतल्या आठवणी उपसुन

तुझ्या मांडीवर डोळे मिटू दे


©ॐप्रकाश शर्मा

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...