*इवलीशी मधमाशी*
नुकताच जागतिक मधमाशी दिवस गेला. त्या निमित्ताने ह्या छोट्याश्या पण अत्यंत कार्यक्षम व कार्यशिल व कोणाच्या फंदात न पडता एकच *छंद म्हणजे मकरंद गोळा* करण्याऱ्या जीवाबद्दल दोन शब्द लिहण्याचं धाडस करावं.
मधमाशीचे दोन मुख्य गुण, एक सतत कार्यरत रहाणे आणि दुसरा म्हणजे एकत्र राहून संकटाशी एकजुटीने मुकाबला करणे. ह्या दोन्ही गोष्टी जर कोणी आत्मसात केल्या असतील तर ते जापान व इस्रायल ह्या लोकांनी. कार्यशिलतेचं व्रत घेऊन आज जापानी लोकांनी पर्यायाने जापानने जबरदस्त प्रगती केली आहे. मधमाशीच्या पोळ्या कडे मानवाशिवाय इतर कुठलाही प्राणी बघण्याची वा छेडण्याची हिम्मत दाखवु शकत नाही.
मधमाशी चे पोळं हे एक सुंदर साचेबद्ध रचना असलेलं शहर. मध्यभागी राणीचा महाल आणि आजुबाजुच्या लहान लहान खोल्यांमध्ये तीचं २४ तास सजग लष्कर.
बाकी कामगार मधमाश्या आपल्या मध उत्पादन व साठविण्याच्या कामात मग्न.
उन, पाऊस वा थंड वातावरण त्यांच्या कामात खंड पाडू शकत नाही. पुर्ण पणे संघटित क्षेत्रात कार्यरत असून कधी मधमाश्या संप, टाळेबंदी, धरणे वा मोर्चा काढत नाही.
मधमाशीच्या ह्या कार्यशिल गुणांची वि स खांडेकर यांनी आपल्या कवितेत दखल घेतली आहे. इतर अनेक कविंनी आपल्या कवितेत पानाफुलांबरोबर मधमाशीला शब्दांत गुंफले आहे.
माझी ही एक चारोळी मधमाशीच्या कार्यासाठी.
**मधमाशी बागडून फुलांवर
करते कणकण मकरंद गोळा
मधमाशी साठवते मध
बांधून झाडांवर पोळा**
करोनाच्या ह्या काळात मधमाशी सारखं जीवन आत्मसात करायला हवे.
कार्य क्षणक्षण
अन्न कणकण
करा साठवण
स्वतः रक्षण
जागतिक मधमाशी दिवसी देवु या धन्यवाद मधमाशीला
सुंदर गोड मधासाठी,
मऊ औषधी मेणासाठी.
©ॐप्रकाश
No comments:
Post a Comment
Thanks for the comments