नवी सुरुवात नव्या सुरुवातीची
नवी सुरुवात नव्या कवितेची
नवी कविता नव्या संकल्पनांची
नवी संकल्पना नव्या आकांक्षांची
नवी आकांक्षा नव्या स्वप्नांची
नवी स्वप्ने नव्या आकाशाची
नवे आकाश नव्या उडानाची
नवे उडान नव्या शक्तीची
नवी शक्ती नव्या कल्पनांची
नवी कल्पना नव्या धुंदीची
नवी धुंदी नव्या स्पंदनांची
नवी स्पंदने नव्या विचारांची
नवे विचार नव्या प्रगतीची
नवी प्रगती नव्या पालवीची
नवी पालवी नव्या आशेची
नवी आशा नव्या दिशेची
नवी दिशा नव्या आयुष्याची
नवे आयुष्य नव्या अस्मितेचे
नवी अस्मिता नव्या ज्ञानाची
नवे ज्ञान नव्या प्रकाशाचे
नवा प्रकाश नव्या किरणांचा
नवे किरण नव्या प्रारंभाचा
नवे प्रारंभ नव्या वर्षाचे
नव्या २०२१ चे
No comments:
Post a Comment
Thanks for the comments