Saturday, January 2, 2021

सृष्टी

 विविध पुष्पांना धारण करून 

इंद्रधनुषी रंगात धरा ही नटली

जणु काही आकाशातुन 

स्वर्गासम सृष्टी अवतरली


मंजुळ कलरव  मनोहर 

पक्ष्यांची आसमंती गुंजती

वाऱ्याची हळुवार झुळूक

फुलांच्या पाकळ्या चुंबती


सहस्त्र फुलांची चादर 

पांघरून अवनी सजली

भ्रमर प्रणव गुंजन गात

सुमनांच्या बाहुत हरवली


सोनेरी रविकिरण मधुचंद्राच्या

रोमहर्षात प्राणी पक्षी झुमती

सृष्टी नववधूचे श्रृंगार घेऊन 

सुगंध पसरवत लहरती

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...