डोळ्यात बघ माझीया सखये
भावनांच्या तळाशी जाऊन
शतजन्मीचे प्रेम माझे दिसेल
अंतरंगातील सौंदर्याने नटून
वर दिसतात अवखळ लाटा
प्रेमाच्या सागरात बघ पोहून
बंद करून डोळे घे एक उडी
स्वर्गसुखात निघशील न्हाऊन
सागराला कवटाळून सरिता
कुशीत जशी घेते हरवून
मिलनाची ओढ तिला असते
आपले अस्तित्व विसरून
डोळ्यात बघ माझीया सखये
स्पर्शाने खुलती मनाची कळी
मनाच्या सुंदर बागेत बहरून
होईल प्रत्येक सांज मखमली
डोळ्यात बघ माझीया सखये
पेरणी प्रेमाची करू तव हृदयी
फुटु दे पुन्हा एकदा अंकुर
सजु दे नटखट धुंद प्रणयी
No comments:
Post a Comment
Thanks for the comments