Tuesday, March 2, 2021

कुण्या गावाची नार ती

 



कुण्या गावाची नार ती

करुनी पदलालित्य तालबद्ध

नृत्य करते आपल्याच धुंदीत

मदमस्त होऊन संगीतबद्ध


डोलती सर्व घालून पिंगा

करत बल्ले बल्ले ती

जीवन म्हणजे काय हे

आनंदाने दाखवत होती


हरवुन आपले वय भान

रुप काया ती विसरली

अंतरंगातील सौंदर्याने नटून 

मनापासून तृप्त होत नाचली


रमणीय कायेला देतात 

प्रसन्न होऊन नेहमी दाद

सांगे ओम तुम्हा सर्वां

मनापासून द्या सुंदर साद


💃💃💃💃💃💃





No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...