राधे राधे
मन माझे हे बावरे
राधे तुझीया चरणी
शक्ती तू माधवाची
भक्ति ही क्षणोक्षणी
राधा एक सूर ताल
मन माझे हे बावरे
ऐकू येते गोड साद
होते तन हे कावरे
राधा राधा एक काव्य
अलौकिक आयुष्याचं
मन माझे हे बावरे
अनुभुती जगण्याचं
राधा राधा एक रंग
मोर पंखांचे पिसारे
चैतन्याने भारलेले
मन माझे हे बावरे
No comments:
Post a Comment
Thanks for the comments