Sunday, March 21, 2021

कविता

 कविता


कविता म्हणजे शब्द सरिता

कविता म्हणजे मनातील भाव

कविता म्हणजे प्रेमाची फुले

कविता म्हणजे हृदयाचा ठाव


कविता म्हणजे कवीचे विश्व

कविता म्हणजे कवीचे प्राण

कविता म्हणजे कवीचे प्रेम

कविता म्हणजे कवीची शान


कवीच्या मनात अंकुरते

कवीच्या भावनेत फुलते

कवीच्या शब्दात गुंफते

कवीच्या हृदयात वसते


कवी कल्पनेच्या पंखांनी

आकाश धरणी व्यापते

नभातून हळूहळू सांडून

पर्ण पुष्पांनी शृंगारते


होळीच्या सणाला विशेष

इंद्रधनुषी रंगात बरसते

दिवाळीला दिव्यांच्या प्रकाश

होवून जग उजळून काढते


सैनिकांच्या जोशात तू

प्रेयसीच्या प्रेमात तू

गायकांच्या सूरात तू

वाद्यांच्या तालात तू


कधी विनोदी होवून

तू हास्य पसरविते

कधी करुणा बनून

अश्रू धारां होते


चिमुकल्यांना हसविण्या 

बाळगीतात वात्सल्य देते

शायरीतून प्रेमिकेच्या 

हृदयात स्पंदन  होते


संतांची वाणी होवून

अभंगातून ज्ञानदान करते

वासुदेवाच्या भैरवीतून

सुरेख सुर्योदय करते


व्यंगबाण धारण करून

कुरीतींवर प्रहार करते

यमक अनुप्रास उत्प्रेक्षा

अलंकारांनी सजते


तूच माझी सावली

तूच माझी सखी

तूच माझा प्राण

तूच माझा श्वास


©ॐप्रकाश शर्मा

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...