पाणी
झाडी झुडपे लावूनीया
करु पर्यावरणीय जतन
वनराजी वाढवूनीया
होईल पाण्याचं संवर्धन
रानावनात बंद करु वृक्षतोड
पाऊस वाढेल जेणेकरून
पाणी शेतीला मिळेल
दुष्काळाचं भय संपवुन
शेतीमळ्याला मिळाले खुप पाणी
तर सुखी होईल शेतकरी माझा
भरपूर पिकलेल्या धान्याने समृद्ध
होईल सुखी ह्या भूमीचा राजा
धनधान्य संपत्ती वाढवून तो
हात भार लावतो प्रगतीला
पाणी आहे सर्वांसाठी संजीवनी
आणि आवश्यक जीवनाला
ओमप्रकाश शर्मा
नाशिक
No comments:
Post a Comment
Thanks for the comments