Thursday, May 6, 2021

भाज्यांची अंगणवाडी-2

 भाज्यांची अंगणवाडी


भाज्यांची सुरू झाली शाळा

मेथी आली आला गाजरमुळा

शेपुपालक घालून हातातहात

वांगे बटाटे बसले झोकात


बाकावर सजल्या भाज्या

अन् सुरू झाली बडबड

गलका केला गिलक्याने

उठे भोपळा करत गडबड


धक्का लागला गावरान

नाजूक कोवळ्या काकडीचा

घरंगळत खाली पडला अन्

लाल झाला गाल टोमॅटोचा


लाल वस्त्र आपलं काढत

धुसफूस करत आला कांदा

अदरकचा आढ्यावेढ्याने

लसणाबरोबर केला वांधा


हिरव्या ड्रेसमध्ये आल्या 

लगबगीने नाजूक भेंडी बाई

पाणी शिंपडून करत शांत

शिकवण्यासाठी केली घाई


मुळातच हुशार शुभ्र मुळा 

झाला वर्गात पहिला माॅनिटर

ढोबळी मिरची दोडका आणि 

कारली यांची बंद झाली टरटर


©ॐप्रकाश

1 comment:

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...