फोटोकाव्य
दि. ११ मे २०२१
आठवणींच्या शांत सागरात
माळून शितल चंद्राचं चांदणं
विचारांच्या सागरांत सुप्त
लाटांनी मंद मंद विसावणं
निशा राणीच्या बाहुत
शितल सौम्य चांदण्यांत
अवखळ अल्लड सागर
विसावत होता काळोखात
सागरांत थरारलेले तरंग
व्यक्त करतात अथांगता
पुर्ण चंद्राचे गोड प्रतिबिंब
सांडत होते मनात शांतता
कर्म अन् भाग्य घेऊन
निघाली होती गलबते
मार्गस्थ सागर पथावर
ठेवती ध्येय नयनांते
©ॐप्रकाश शर्मा
नाशिक
No comments:
Post a Comment
Thanks for the comments