Friday, March 26, 2021

होळी

 



ही होळी


कोरोनाचा काळ्या रंगात आली

निराशेने न्हाऊन निघाली होळी

भविष्याचे भाकित करता करत

लाॅकडाउन लावता लावून गेली


गत वर्षीच्या वेदना विसरून

ह्या वर्षीच्या आशा उभ्या करुया

कोरोना हा हुताशनीत जाळून

पुन्हा एकदा धैर्याने तोंड देवु या


नको ते रंग द्वेषाचे

नको ते रंग आक्रोशाचे

नको ते रंग हिंसेचे

नको ते रंग दुःखाचे


नको त्या विविध रंगाच्या छटा

नको त्या रंगीत पाण्याच्या लाटा

इंद्रधनुषी रंगातील आठवणी

उपसून गाल गुलाबी करुया


ही होळी करुया साजरी

आनंदाचा डोहात न्हाऊन

ओंजळ भर संसार सुख

अन् माणूसकीने रंगवून

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...