Sunday, May 26, 2024

8 वी व्याख्यान माला २०२४

 *8 वी व्याख्यान माला २०२४*


विशाल अशा भावसार भवनी 

बाग फुलवली सुंदर शब्दांची 

चार दिवसीय व्याख्यानमालेने 

मनावर कोरली छाप विचारांची 



गुंफले प्रथम व्याख्यान पुष्प   

*संदिप देशपांडे* सरांच्या मधुर वाणीने

विनोदाचे गांव फिरवत  

हास्य खळखळत्या झऱ्याने 


*रमेश पडवळां* नी सजवले 

द्वितीय पुष्प नाशिकच्या वारसाचे

जसे गोदा माईचे नाद झंकारले शब्द धारांचे


तृतीय पुष्पात *सुरेश साळुंके* नी दाखविली 

पाऊल वाट आनंदी जीवनाची 

पुन्हा सज्ज झालो आम्ही 

हर्ष मानसी राजयोगानी 


घेऊन सुमधुर सुरांना 

केली उधळण गझलेची 

चौथ्या पुष्पात *शितल ताई* नी 

हृदये भरली आनंदाची


हिंडोळा व्याख्यान स्वप्नांचा 

भिडला मनाच्या आकाशी  

रमले सर्व हर्षाच्या दुनियेत 

विसरले दुःख वास्तवाशी 


व्याख्यानांच्या यशस्वीतेला 

साथ मिळाली आयोजकांना 

आभार लहरी उचंबळल्या 

व्यक्त करत आपल्या भावनांना 


भावसार समाजाने दिला 

वातानुकूलित भवन

वैशाख वणव्यात अनुभव

कुल कुल शितल मन 


*© ओमप्रकाश शर्मा*

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...