Monday, April 5, 2021

रुणझुण


रुणझुण


रुणझुण करत एक बाळ

कविता करायला आलं

शब्दात शब्द गुंफून घेत

ओळींचा चालीवर चाललं


नाद विविध कवितेचे ऐकत

हृदयात स्पंदन निर्माण झाली

एकेक प्रगल्भ प्रतिभा बघून

बोबडीच वळत प्रतिमा झाली


रुणझुण धुंद लहरींचा सूर

मनातल्या आठवणींचा ताल

गुणगुणत रम्य वसंत ऋतूच्या

आगमनाची अति सुंदर चाल


आभार धन्यवाद मानतो

आपल्या उत्कृष्ट स्वागताचे

अनुभव घेत शब्द मंदिरात

दर्शन घडेल सारस्वतांचे


©ॐप्रकाश शर्मा

1 comment:

  1. प्रतिभा आणि प्रतिमा

    ReplyDelete

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...