लस
हे माझी प्रिय लसे
आतुरतेने वाट पाहत
एक दिवस अचानक
आली लसकन धावत
स्वप्नवत तुझे आगमन
संचारत नसानसात
तन मन हरवलं माझं
भिनलीस तु कणाकणात
अभिमानाने सांगत होतो
आज मी घेतली आहे
आश्चर्याने थक्क झालो
जशी थोडी चढवली आहे
अधिर होते मन माझे
भिजण्यास तुझ्या थेंबांत
झिरपत जाईल तुझा नशा
लसलसीत होऊन शरिरात
आजचा दिवस लसीचा आहे
आता उद्याची चिंता कशाला
बिनधास्त जगायचं आनंदात
कोरोना काळ आठवु कशाला
घ्या हर्षाहर्षाने काढून सेल्फी
संधी आहे लस वर्षावाची
न ठेवता कुठलीही भिती
छत्री ही कोरोना बचावाची
©ॐप्रकाश शर्मा
No comments:
Post a Comment
Thanks for the comments