आयुष्याचं गणित
आयुष्याचं गणित कधी सुटले
दोन अन् दोन चार कधी झाले
आयुष्याच्या सुखाची बेरीज करताना कोणी हात दिला
तर दुःखाची वजाबाकी करताना कोणी हात काढला
आयुष्याच्या प्रमेयामध्ये स्वतःची बाजु कशी सिद्ध करावी
जीवनातील कठीण प्रश्न कशी सोडवून टाकावी
जे गृहीत धरले ते पळून गेले
नको ते समोर उभे ठाकले
आयुष्यात कुठलं लावावे सुत्र
मनाप्रमाणे वागत नाही पुत्र
भूमितीचे समजले विविध कोन
आयुष्यात न कळला दृष्टिकोन
एकावर एक होतात अकरा
एकाएकाने बनविले मात्र बकरा
जर तर करत मांडलेले गणीत
शेवटी अपुर्ण रहातं सुटसुटीत
गणीताची समीकरण ठेवताना
आयुष्य विनाकारण होताना
बेरीज वजाबाकी गुणाकार
वा करुन भागाकार
वर्तवणे कठीण जीवनपटाला
मिळेल असा आकार
आयुष्याच्या शेवटी उरतं शुन्य
समजत नाही काय पाप पुण्य
No comments:
Post a Comment
Thanks for the comments