क्षणभर आठवणी
आठवणींच्या ढिगातून आठवतात
क्षणभर आठवणी,
आठवणींच्या ढगातुन
टप टप पडतात क्षणभर आठवणी
आठवणींच्या आकाशातुन
निखळतात क्षणभर आठवणी
आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेतात क्षणभर आठवणी
आठवणींच्या बॅंकेतून
मिळतात क्षणभर आठवणी
आठवणींच्या अश्रुपुरात
वाहतात क्षणभर आठवणी
आठवणींच्या तिव्र उन्हात
चटके देतात क्षण भर आठवणी
आठवणींच्या मोरनृत्यातुन
नाचत येतात क्षणभर आठवणी
सुख दुःख, चांगले वाईट
शिकवतात क्षणभर आठवणी
No comments:
Post a Comment
Thanks for the comments