प्रणय गीत
अलगद घसरली पहाटे रात्र
मिलनाचं मधुर गुंजन सांगत
आवेगाच्या तरंगात मावळला चंद्र अधर स्पर्श आठवत
मंद स्पर्शाने लाजत होती अबोली
शृंगाराच्या साजाने हसली मंद लाडली
प्रणव गंधात धुंद होऊन ती बहरली
अधर रस प्राशनात तृप्ततेने हरवली
श्वासात श्वास गुंफून
नाजूक स्पर्शाने थरथरली
प्रणय सागरात पोहुन
आनंद डोहात तरंगली
उन्मादाने उठणाऱ्या लाटांवर आरुढ होवुन स्वर्ग सुखाची उत्तुंग भरारी अति विशाल नभात तीच पुर्ण आनंदाची
प्रणय हिंदोळ्यावर झोके घेत
सप्तरंगी इंद्रधनुष्यावर डोलत
गोड सहवास तो सुखाचा
ओढ तिव्र आतुर मनाचा
No comments:
Post a Comment
Thanks for the comments