Saturday, January 2, 2021

विचारांच झाड

 फुलोरा रोवण्यासाठी देतात 

सुंदर सुंदर बिज विचारांचं 

विचार घेऊन कवि कवियत्री 

मोड आणतात काव्य अंकुराचं


विविध वैचारिक मंथन करून

घालतात खत पाणी अलंकारांची

हळूहळू तरंगत पालवी फुटुन

डोलतात कडवी भावनांची 


शृंगार वीर करुण हास्य व्यंग 

सांडतात विविध रस धारा

सौंदर्याचे लेणे घेऊन वाढतो

पिऊन शब्दांचा ऊन वारा


शब्द संपत्ती वाढवून उमलते 

एक सुंदर कोमल कळी

जन्म घेऊन चार ओळींची 

आकारात येते चारोळी


यौवनात येऊन बहरते 

प्रफुल्लित विचारांचे झाड

विचारांच्या स्पंदनातुन निर्माण

होते कधी कवितेचे माड


विचारांचा झाडावर लागतात

लालित्यपूर्ण लेख कथा 

आणि फुलतात काव्यात्मक

सुंदर कवितेच्या लता 


सर्व कवी कवयित्री साठी

फुलोरा कलेचे माहेरघररुपी

विचारांच्या झाडावर बहरतात 

कवितांच्या वेली आनंदरुपी

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...