📱
माझा फोन
माझा फोन माझा सवंगडी
असतो हातात माझ्या हरघडी
मित्रांशी गप्पा संवाद भेट
नातेवाईकांशी करवतो थेट
माझा फोन म्हणजे अंतरंग मित्र
श्वास माझा अत्र तत्र सर्वत्र
माझा फोन म्हणजे सुंदर जीवन
माझा फोन आहे स्मार्ट
त्याचा पाशी विविध आर्ट
भाव व्यक्त करायचे साधन
माझा फोन म्हणजे हृदय स्पंदन
दर्शवतो आल्हाददायक स्वप्नं
मित्रांचे घेऊन येतो संदेश
असतील स्वदेश वा परदेश
माझा फोन म्हणजे मनोरंजन
अप्रतिम वाचन अन् गायन
माझा फोन म्हणजे ज्ञानाचा खजिना
पुरवितो अध्यात्म खाद्य मना
रेल्वे बस कार बुकिंग करून
वाजवतो अनेक मधुर धून
कोंबडा बनुन आरवतो पहाटे
ट्रेनर होऊन करवतो कराटे
घेतो आरोग्याची काळजी
मोजुनी पाऊलं व गती
गंतव्य स्थानाचे अंतर
व दाखवत़ो रस्ता निरंतर
औषधं, प्रोव्हीजन, हवं ते
मागवुन घेण्यात आनंद येते
विविध खेळ खेळवतो असं
दोन मित्र अगदी समोर जसं
बॅंक व्यवहार पुर्ण करतो
हिशेब चोख अगदीं सांगतो
विज बिल रिचार्ज करतो
वेळेवर आठवण बिनचूक देतो
कधी मित्र होत विनोद सांगतो
कधी प्रेयसी होत शायरी ऐकवतो
कथी टीव्ही, रेडिओ होतो
बातम्या व घडामोडी सांगतो
असा हा कलाकार हरहुन्नरी
माझा प्राण की जीव सर्वोपरी
माझा फोन एक जादूई जीन
तयाविणा पडत नाही चैन
माझा फोन माझा सवंगडी
No comments:
Post a Comment
Thanks for the comments