स्वप्न
आभास माझे सत्य झाले
नकळत स्वप्न चालुन आले
तुझे झाले माझे मन
स्वर्ग सुखात न्हाले तन
हिंदोळ्यावर घेत झोके आठवणी
तनमन अजून फुलते क्षणोक्षणी
असेच स्वप्न चालुन येईल का
स्वर्ग सुखात नभी भरारी घेईल का
सप्तरंगी सुखाची क्रांती पुन्हा एकदा
मन अधीर होतेय प्रत्येकदा
सुखाचा तो सहवास गोड
अजुन आतुर मना ओढ
उन्माद आठवणी उसळली मनात
जणु स्वप्न चालुन आले प्रेमात
No comments:
Post a Comment
Thanks for the comments