कागद
हळुच विचारले कागदा कागदा तुझा रंग कसा
कागद म्हणाले जसा तु करशील व्यक्त तसा
लहान बालकांच्या रेषा
गिरवतात इवल्या बोटांनी
बाराखडी अंक आणि
रंगतो नाजुक चित्रांनी
रमणीय कायेच्या प्रेमात न्हाऊन गुलाबी प्रेमपत्र होतो
हृदय भंग पक्ष्यांसाठी
अश्रूमय करुण आर्त करतो
परमेश्वराच्या ठायी लिन
भक्तांचा कवन अभंग होतो
देशासाठी बलिदान देणाऱ्या
विरांसाठी विररस गीत गातो
हक्क पत्र नोटीस वकील पत्र
जन्ममृत्यू पत्र बनून फाईलीत
तर बाॅंड नोटा बनून संपत्ती
बनून बंद होतो तिजोरीत

No comments:
Post a Comment
Thanks for the comments