Sunday, December 27, 2020

चार क्षण

 

एक क्षण देशासाठी

एक क्षण समाजासाठी

एक क्षण कुटुंबासाठी

आणि एक क्षण स्वतःसाठी

असे चार क्षण जगावे आयुष्यासाठी

 

एक क्षण बाळपणात

एक क्षण तारुण्यात

एक क्षण गृहस्थीचे

एक क्षण वार्धक्याचे

असे चार क्षण जगावे जीवनाचे

 

एक क्षण अनुभवाया दुःख

एक क्षण आनंदाया सुख

एक क्षण वाहवया आसवे

एक क्षण चमकावया काजवे

असे चार क्षण  जगावे जगण्यासाठी

 

एक क्षण आई वडीलांकरीता

एक क्षण अर्धागीनी करीता

एक क्षण मुलं आणि नातु करीता

एक क्षण मित्रांकरीता

असे चार क्षण जगावे आनंदाकरीता

 

एक क्षण शब्दात सांगता

एक क्षण वाक्यात वर्णवता

एक क्षण लेख लिहिता

एक क्षण काव्य करता

असे चार क्षण जगावे गुणगुणता

 

एक क्षण खेळ खेळला

एक क्षण प्रेम माळला

एक क्षण संसार सोशला

एक क्षण वैराग्य काढला

असे चार क्षण जगावे जगासाठी

 

एक क्षण तिखट

एक क्षण कडवट

एक क्षण आंबट

एक क्षण गोड

असे चार क्षण जगावे स्वादासाठी

 

एक क्षण लालसर

एक क्षण निळसर

एक क्षण हिरवट

एक क्षण पिवळसर

असे चार क्षण जगावे चतुरंगासाठी

 

चार क्षणाचे आयुष्य

चार क्षणाचे जीवन

जगावे सुंदर मनसोक्त

चार चौकार फटकारुन

 

1 comment:

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...