Sunday, December 27, 2020

चहा चहा

 

सकाळी सकाळी अंथरुणातला चहा

म्हणजे झोपेतून जागे करणारा

आॅफीस मधला पहिला चहा

म्हणजे कामाचा शुभारंभ करणारा

दुपारी दोन वाजताच्या चहा 

म्हणजे थकवा दूर करणारा

संध्याकाळी बिस्किटांबरोबरचा चहा

कामाचा कंटाळा घालवणारा

पाऊस, कांदा भजी अन् गरम चहा

म्हणजे मन आल्हादक करणारा

कडक उन्हाळ्यात घामासह चहा 

म्हणजे गारवा देणारा

कडकडणाऱ्या थंडीत तिच्या बरोबर चहा

म्हणजे परमानंद देणारा

कस्टमर बरोबरचा चहा 

म्हणजे सौदा पटवणारा

साडी दुकानदाराने दिलेला चहा 

म्हणजे खिशा कापणारा

अनुभवी तज्ञांच्या सोबत चहा

म्हणजे आयुष्याची दिशा बदलणारा.

घरी पदार्पण करणाऱ्या पाहुण्यांच्या 

चहा म्हणजे आदर दर्शवणारा

कांदेपोहे सह झुकल्या नजरेने मिळणारा 

चहा म्हणजे विकेट पाडणारा

आणि मित्रांसह कटिंग चहा

म्हणजे खरा जिव्हाळा असणारा

 

1 comment:

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...