Sunday, December 27, 2020

राशी माझी तुळ

 

कलेचा मी पुजारी

उर्जेचा मी भंडारी

मग्न असतो नेहमी शोधण्यात मुळ

राशी माझी तुळ

 

कार्य भरपूर करुनी

कौशल्य सदा वापरुनी

मनात असते नविन काहीतरी करण्याचे खुळ

राशी माझी तुळ

 

आयुष्यात आले कठिण प्रसंग

कधी नाही सोडला व्यासंग

शांडिल्य ऋषींचे आहे कुळ

राशी माझी तुळ

 

जिवाभावाचे मित्र मैत्रिणी

आनंददायी असतो क्षणोक्षणी

पोटात नाही कुणा बद्दल शुळ

राशी माझी तुळ

 

व्यायाम,योग याची नित्य आवड

राशीनुसार विचार अन् काम बॅलन्सड

बोलतां सांगतां तोंडांत असतो गुळ

राशी माझी तुळ

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...