Sunday, December 27, 2020

थंडी

 


निशा राणी काळोखाच्या प्रेमात न्हाऊन निघाली

लाजुनी पहाटे हरी विश्वात गुलाबी थंडी सांडुन गेली

 

गुलाबी थंडीत पेटवली शेकोटी

भोवती आप्त मित्रांची टोळी

सांडलेल्या थंडीत हात शेकुन तन मन उष्णता घेऊ लागली

 

सुगंधात धुंद होऊन चंद्र चांदण्याचा सडा टाकू लागला

भिजल्या ऊषा राणीने शेकोटी गितांचा नवरंग उधळला.

 

दव बिंदूत न्हाऊन पाती

लाजत ओली चिंब झाली

शेकोटीची उब घेऊन

शरमेने लाल पिवळी झाली.

थंड थंड थंडीची लाट जरी एक विशेष न्यारी

गुलाबी ह्या थंडीत उबदार शेकोटीची मजाच खरी


No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...