*अवतरण कवितेचे*
मार्च एकतीस
निवृत्तीची टीस
अचानक कामात ब्रेक
उमजेना करावे काय एक
कुणी म्हणे सर्व बंद
कोणी सांगे करा छंद
नातवंडात खेळा
मित्रात मिसळा
पुन्हा पार्टटाईम नोकरी
देवधर्माची चाकरी
पुस्तक ग्रंथ वाचा
मनसोक्त नाचा
एकही गोष्ट जमेना
मन कशात रमेना
असेच दिवस जायचे
नुसतीच झोप काढायचे
मंदिरात केले दर्शन
ऐकली बरीच प्रवचन
कसरत योगा ध्यान
रहात नव्हते भान
चालून चालून पाय थकले
प्राणायाम पुढं हात टेकले
पस्तीस वर्षे मोजले आकडे
पण आता तेही झाले वाकडे
मन कशात लागेना
डोकं कशाला चालेना
शिरावर वाटाया लागलं भार
जिकडे तिकडे दिसे अंधार
अंधारात चमकला शब्द एक
एकेका नंतर अवतरले अनेक
शब्दात शब्द गुंफू लागले
वाक्यात वाक्य तरळले
शब्दांच्य ओळी धावू लागल्या
भावना अंतरीच्या नाचल्या
स्पंदने हृदयात होती
भावसागरात जसं मोती
फुलली अंकूर विचारांची
पालवी फुटली स्वप्नांची
यमक प्रकाश जुळती
उपमा अलंकार लेवती
सुर्य किरणे नभी पसरली
उषाराणीने दवबिंदू सांडली
डोंगरात कोकीळेची तान
पानं फुलं उमलली छान
मनाच्या उपसून आठवणी
अंतर्मनी कोरलेल्या साठवणी
वाहून निघाली शब्द सरिता
अशी अवतरली मनी कविता
©ॐप्रकाश शर्मा
No comments:
Post a Comment
Thanks for the comments