Thursday, May 13, 2021

मास्क

 मास्क न लावताच कोण

भर गर्दीत फिरत होते

कोरोनाचा प्रसाद लोकांना

हळूहळू वाटत जात होते


होता अंतरावर सहा फूट

मास्क जरी लावला होता

सॅनिटायझरने हात पकडून

क्वारंटाईन गुपचिळी होता 


लागली चाहूल लाॅकडाउनची

जणू घरात कैद करून ठेवले

एकांती भिंती बघत बघत

मित्रांच्या भेटी लोचन तरसले


मृत्यूची गुप्त चाहूल लागताच

काय माझे हे कळून चुकले

नात्यांच्या नाजुक धागा फक्त

भाबडे शब्द बरळू लागले


स्मशान शांततेचा तो आभास

वितळणाऱ्या चेहऱ्यांचा भाव

आणि प्रश्न उभा करत होता

जिंकलेल्या आयुष्याचा डाव

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...