Friday, December 24, 2021

उतारवय

 उतारवय


उतारवयात मी 

एकटाच राहतो

मनात मी कधीतरी 

मलाच  पाहतो


अबोल पुटपुटत शब्द 

मनास मीच बोलतो

नकळत अर्थ मग

मनातल्या मनात सांगतो


कधीं कधीं स्वैर होत 

मनस्वीच वागतो

मनास साक्षी घेऊनी

रात्र रात्र जागतो


उमलत्या भावना 

मनालाच सांगतो

डोळे बंद करुनी मी

अंतरंगात पाहतो.


होताच मनासारखे

मनातच हासतो

कंठ येऊनी दाटता 

आसवातूनी वाहतो


प्रवास हा उतारवयात ही

अखंड चालत राहतो

काही तरी नव करुनी 

जगून मी ही पाहतो


येता एखादी कळ

यमाचा कॉल समझतो

वाढणाऱ्या सावलीस

कधी उगाच घाबरतो


वाढणाऱ्या ह्या वयास

का उतारवय म्हणतो   

नातवासह नव नवीन   

काही तरी शिकतो      


©ॐप्रकाश शर्मा

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...