Wednesday, January 25, 2023

अनमोल मित्र

 *मुंशी प्रेमचंदजींच्या एका "सुंदर कवितेचा स्वैर अनुवाद-_*



आकांक्षा नाही माझी

प्रसिद्धी चे शिखर चढण्याची,


        आपण मला ओळखता 

        तेवढे पुरे आहे 


चांगल्या ने चांगलं आणि 

वाईटांनी वाईट म्हटले 


  ज्याची जेवढी गरज तेवढेच

      मला  त्यांनीं समजले 


आयुष्याचे तत्व किती वेगळं आहे,


   संध्याकाळ संपता संपत नाही आणि

वर्षा मागून वर्ष निघून जात आहे 

    


एक विचित्र 

स्पर्धा आहे जीवनात,


       "जिंकत गेलो तर 

आपलेच मागे पडतात

आणि हरलो तर आपलेच मागे टाकून निघून जातात" 


जमिनी वर राहतो सतत 

मला माझी स्थितीच बरी वाटते

     

सागरा पासून शिकलो

जीवन जगण्याची कला 

शांत राहून आपल्यात मस्त राहणे

        

असं नाही की माझ्यात 

काही गुण नाही


पण खरं सांगू इच्छितो

माझ्यात दुर्गुण नाही 


इर्षा करतात माझ्या शैलीचे 

विरोधी माझे


नाही मी प्रेम बदलले

आणि न मित्र बदलले


हातावर घड्याळ काय बांधले

   "वेळ" माझ्या मागेच लागला!


म्हटलं घर बांधून निश्चिंत

राहू 

पण घरातील गरजांनी 

भटकंती करु लागलो

         

बाळपणीची मजा नको सांगू

तो रविवार आता येत नाही 


आयुष्याच्या धावपळीत

का वेळेचे इंद्रधनुष्य हरवत नाही 

         

हसतं खेळतं आयुष्य ही

साधारण वाटतो


 कधी सकाळ हसून उगवत होती

अन् आता चेहऱ्यावर हास्याची रेषा उमटायला संध्याकाळ होते

    

किती लांब आलो नाते गोते

सांभाळत


स्वतः हरवलो आपल्यांना शोधत 

    



 लोकं म्हणतात       

आपल्या चेहऱ्यावर हास्याचा झरा वाहतो 

             

आम्ही मात्र थकलो

अश्रू पीता पीता


आनंदी आहे आणि सर्वांना आनंद देतो

            

निष्काळजी आहे मी पण 

काळजी सर्वांची करतो


समजतं मला कवडी मोल 

आहे मी 

    

तरी अनमोल मित्र बाळगतो मी

तरी अनमोल मित्र बाळगतो मी

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...