Wednesday, January 25, 2023

पतंग

 पतंग



पतंग म्हणजे पतंग 

आभाळात उर्जा भंडारीला

पाठवलेली आमंत्रण पत्रिका


पतंग म्हणजे आकाश रुपी

मनात भक्तीची दोरीने बांधून

परमात्म्याला निमंत्रण पत्रिका


पतंग म्हणजे आयुष्याच्या नभात 

कर्तृत्वाच्या उत्तुंग भरारीची विजय पत्रिका 


पतंग म्हणजे उदास हृदयाच्या 

पटलावर उत्साहाने दिलेली 

प्रसन्नतेची भाव पत्रिका


पतंग म्हणजे जीवनातील नात्याचा 

धाग्यांनी बांधलेली

सुंदर सुरेख कुटुंब पत्रिका 


पतंग म्हणजे तारुण्यातील हृदय

 अर्पण करण्यासाठी लिहिलेलं गुलाबी प्रेमपत्र 


पतंग म्हणजे तीळाला

गुळाच्या दोरीने बांधून

गोड बोलण्याचं आग्रह पत्र


 पतंग म्हणजे माझ्या कवितेतून 

व्यक्त केलेले

मकर संक्रांतीच शुभेच्छा पत्र


*©ॐप्रकाश शर्मा*

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...