*२०२३-कदन्न धान्य वर्ष*
भारताच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन युनेस्कोने २०२३ हे वर्ष कदन्न धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरवले असून ह्या २०२३ पुर्ण वर्ष भरात कदन्न म्हणजे भरड धान्याला उत्तेजन देऊन त्यांची महती जगापुढे आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.
भारतात २०१८ साली भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले होते. भरड धान्यात प्रामुख्याने बाजरी, ज्वारी, नागरी, इ समाविष्ट होतात. भरड धान्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते कमी पाण्यात व कमी उपजाऊ जमीनीवर त्याचं पिक उत्पादन करता येतं. व ह्या प्रकारच्या धान्याला भाव ही गव्हापेक्षा अधिक मिळून शेतकरी वर्गाला आर्थिक फायदा होऊन त्यांची प्रगती होते.
जगाला सध्या हवा आणि पाणी परिवर्तनाला सामोरे जावे लागत आहे. त्याअनुषंगाने धान्य उत्पादन प्रक्रियेत अमुलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. ह्या साठी भरड धान्य म्हणजे मिलेट उत्पादन हे मोलाची भूमिका बजावू शकते.
भरड धान्य आरोग्यासाठीही अत्यंत लाभकारी आहे. कमी कॅलरीज व कोलेस्टेरॉल रहीत असलेले हे धान्य आजच्या काळात आवश्यक
झाले आहे. मधुमेह व कोलेस्टेरॉल हे जगाला भेडसावणाऱ्या समस्यांपैकी एक विक्राळ समस्या आहे. आणि ह्या दोन्ही समस्यांचा सामना करण्यासाठी भरड धान्याचा वापर वाढवून जरूर करु शकतो.
भरड धान्य उत्पादन प्रक्रियेत भारत जगाला नेतृत्व देऊन फार मोठ्या जबाबदारीने मार्गदर्शन करू शकतो.
आपण ही आपल्या आहारात भरड धान्यांचे विविध पदार्थ सामील करून सदृढ आरोग्य प्राप्त करु शकतो. येत्या २०२३ ह्या वर्षीच्या विविध कार्यक्रमात जनजागृती सर्व समाजातील घटकांनी करणे आवश्यक आहे. लहान मुले व तरुण वर्गाला भरड धान्य खाण्यासाठी प्रवृत्त करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना आवडणारे वा आकर्षणाचे पदार्थ जसे पिझ्झा, बर्गर, नुडल्स, ह्या सारख्या अनेक पदार्थांच्या रेसीपी तयार करून त्यांचें कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत.
२०२३ च्या भरड शुभेच्छा.
No comments:
Post a Comment
Thanks for the comments