Wednesday, January 25, 2023

सरिता

 *सरिता*


तुझीच प्रेरणा माझ्या कवितेत असते 

तुझी छाया माझ्या प्रतिभेत उमटते


जन्मोजन्मीचे हे नाते आपले 

श्वासागणिक तु मला जपते

निस्वार्थी त्यागाचा सिद्धांतात

भाव मनीचे वृद्धिंगत करते


तुझ्या निस्सीम प्रेमात 

माझ्या अतूट श्रद्धेत

तुझ्या अपरिमित भक्तीत 

माझ्या अपेक्षांचा प्रार्थनेत

अंतःकरणाने साथ तुझी असते

तुझीच प्रेरणा माझ्या कवितेत असते

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...