मनाच्या आरशात दिसतोय
सावळा चित्तचोर मनमोहन
गुंता आयुष्याचा सोडवतोय
हाती घेऊन फणी राधामोहन
हरवली राधा पाहून प्रतिबिंब
झाली स्पर्शाने ती मती गुंग
उचंबळू लागला सागर प्रितीचा
नयन राधेचे झाले मग धुंद
आत्मा बघून परमात्म्याला
सोपवितो तन आणि मन
राधा अर्पित झाली कृष्णास
आयुष्याच्या प्रेमाचे क्षण क्षण
No comments:
Post a Comment
Thanks for the comments