*
नुसताच बोभाटा नको नको मला
माणसा तुझा प्रतिसाद हवा आहे
शहरातील खुराट्यात नकोच
निसर्गाच्या कुशीत हवा आहे.
जंगल तोड नको नको मला
माणसा रानात तुच हवा आहे,
वृक्षतोडीचा संहार हा नकोच
वृक्षसंवर्धनाचा खेळ हवा आहे.
प्रदुषण तर नको नको मला
माणसा निर्मल वागणे हवे आहे
प्लास्टिक वापर मुळी नकोच
साथ ह्यासाठी तुझे हवे आहे.
पाण्याची नासाडी नको नको मला
माणसा पावसात तुच हवा आहे,
पाण्याविना भटकणारा तु नकोच
चिंब चिंब भिजत हवा आहे.
कवितेत फक्त नको नको मला
माणसा शब्दांच्या थेंबात हवा आहे,
गाण्या चित्रात फक्त नकोच
वागण्यातून तुझ्या हवा आहे
नुसत्याच शुभेच्छा नको नको मला
माणसा *कृतीतून* हवा आहे
फक्त आश्वासन होप नकोच
वरांड्यात एक रोप हवा आहे.
*© ओमप्रकाश शर्मा*
No comments:
Post a Comment
Thanks for the comments