Wednesday, June 7, 2023

सहवास

 *विषय-सहवास*


शब्द वेडा होतांना धुंद 

हरवला श्वास हा माझा

शब्द प्रितीच्या भावनेने 

सखी कविते सहवास तुझा 


यमक अनुप्रास उपमांनी 

सजवतो रस शृंगार तुझा

कल्पनेच्या भाव विश्वात 

रंगवते सहवास माझा


फुलपाखरा संग मन फिरे

मकरंद चाखण्यास तुझा 

शब्दसुमनांचा मधुर सुगंध 

वेड लावी जीवा माझा


जन्मोजन्मीचे वाटे मला 

नाते हे जणू भाग्य माझे

शब्दांच्या ढगातून अवतरते

जणू चिंब सहवास तुझे


शब्दांच्या मंद हिंदोळ्यावर

झुलतो धुंद सहवास तुझा 

सागर लहरी सम प्रेरक

भिजवतो सहवास माझा


ओमप्रकाश शर्मा

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...