*सांजवेळी आयुष्याच्या वळणावर*
दिवशी एका सांजवेळी
आठवणींच्या हिंदोळ्यावर
साठीच्या काठीसह डोलले
उंच त्या झोक्यावर
ओंजळीत भरलेल्या क्षणांनी ,
केला साठीचा सोहळा !
आठवणींना झुळवून ,
नाचवला मनाचा भाव आगळा
आयुष्याची क्षणे हातून निसटली
जशी सागर तटीची वाळू
अस्ताव्यस्त नात्यांचा गुंता
हृदयी कसे ते कवटाळू
सांजछायेच्या ह्या काळात,
हास्याचा सुंदर हा मंत्र
सुसह्य करण्यासाठी उपयोगी,
आपले जीवन तंत्र
आनंदी राहण्याची गुपिते
अचानक मनात उलगडली
मनाच्या गाभाऱ्यातील
प्रकाश किरणं चहुकडे पसरली
© ओमप्रकाश शर्मा
No comments:
Post a Comment
Thanks for the comments