*व्हिस्की दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा*
आज आहे 20 मे
धुंद दिवस व्हिस्की
म्हटलं बसावं मित्रासंग
होईना का थोडं रिस्की
आणावं चकणा थोडा
अन् घ्यावी एक चुस्की
माराव्या बढाया इतक्या
मित्र मंडळी म्हणे बसकी
इतक्यात आली ही म्हणे
कोण आहे हा झेलंस्की
मारतोय बाता बघा
किती किती फुस्की
मला वाटतंय ह्याने सांजेला
टाकली कोणासंगं थोडीस्की
बायकोने दिली नाही का
दोन चार ह्याचा डोस्की
मी काय समजायचे ते
बसायचा आधी ठसकी
काढला तो मनातून विचार
नको तो दिवस नको ती व्हिस्की
*©ओमप्रकाश शर्मा*
No comments:
Post a Comment
Thanks for the comments