Monday, May 22, 2023

७ वी व्याख्यान माला २०२३*

 *७ वी व्याख्यान माला २०२३*


विशाल अशा भावसार भवनी 

बाग फुलवली सुंदर शब्दांची 

चार दिवसीय व्याख्यानमालेने 

मनावर कोरली छाप विचारांची 



गुंफले प्रथम व्याख्यान पुष्प   

*अश्विनी ताईं* च्या मधुर वाणीने

बचतीच्या पारंब्या लोंबकळत 

विकास साधला गटागटाने 


*सतीश वाणीं* नी सजवले 

द्वितीय पुष्प कथाकथनांचे

जसे सुरांना छेडिले असता 

नाद झंकारले शब्द फुलांचे


तृतीय पुष्पात केले नात्यांचे 

सर्व्हिसींग *विश्वास ठाकूरांनी* 

पुन्हा सज्ज झालो आम्ही 

नाते जोडण्या सुसंवादानी 


घेऊन सुगंध फुलांकडुनी 

केली उधळण वपु कथांची 

चौथ्या पुष्पात *वृंदा ताईं* नी 

ओंजळ भरली आनंदाची


हिंडोळा व्याख्यान स्वप्नांचा 

भिडला मनाच्या आकाशी  

रमले सर्व हर्षाच्या दुनियेत 

विसरले दुःख वास्तवाशी 


व्याख्यानांच्या यशस्वीतेला 

साथ मिळाली आयोजकांना 

आभार लहरी उचंबळल्या 

व्यक्त करत आपल्या भावनांना 



*© ओमप्रकाश शर्मा*

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...