*अवकाळी पाऊस*
अचानक आले ढग भराभरा
चमकता वीजा त्या कराकरा
गोंधळून गेला शेतकरी माझा
आल्या पाऊस धारा सरासरा
अवकाळी कशा पाऊस धारा
खट्याळ तुफान होता तो वारा
वाचवता वाचवत पीक आपले
डोळ्यातून वाहती अश्रूधारा
झाडं कोळमडली सहूनी मारा
जोरदार कोसळल्या त्या गारा
अवकाळी आलेल्या पावसाने
हरवला रहाण्याचा तो निवारा
कर्जात खोल बुडालेल्या
अवकाळीने झोडपलेल्या
आधाराचा हात द्यायला हवा
ह्या नशिबाने साथ सोडलेल्या
No comments:
Post a Comment
Thanks for the comments