Wednesday, May 10, 2023

भाकरी

 भाकरी फिरवताना भलत्यांना 

लागले भरपूर गरम चटके

ताट घेऊन वाट पाहत बसलेले

खात राहिले शब्दांचे फटके


नाही फिरवली भाकर

नाही फिरले घड्याळाचे काटे

नाही पालटले नशीब 

मन मात्र फिरते कमळाच्या वाटे


चुलीत राहिला नाही जाळ

कसा तापणार सत्तेचा तवा

हवेत विरली आता पंतप्रधान 

होण्याची उरली सुरली हवा


जाता जाता जाणता राजा

परत एकदा गुमान थांबला

भाकरी फिरवताना राजा

तवाच थंड करून बसला


ओमप्रकाश शर्मा

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...