Sunday, April 16, 2023

शब्द ब्रम्हाची शिदोरी

 आज सकाळी सकाळी मनाला 

लागली होती कडक भूक

म्हटलं बघू मनाच्या कप्प्यात 

आहे का काही आपसूक


खुशखुशीत शब्द भाजणीची चकली 

व तिखट शब्दांची कडबोळी

स्निग्ध शब्द युक्त वरण भात

मस्का ओळीं लावलेली पोळी


उपमा अलंकारांनी सजवलेली

मधुर आठवणींची ती शिदोरी

सरांनी पाठीवर दिलेली कौतुकाची 

थाप जशी शब्दांची गोड सांजोरी 


आज तोच शब्दांचा खुराक 

देतात मनाला जगण्याची शक्ती 

हदयात निर्माण करतात अनण्य

अशी निर्गुण निराकार भक्ती 


आता शब्दच श्वास शब्दच 

पाणी आणि शब्दच अन्न 

केवळ जगण्याची आस 

म्हणजेच शब्द परब्रह्म


®ॐप्रकाश शर्मा

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...