Saturday, February 19, 2022

शब्दांच्या अभयारण्यात

 *शब्दांच्या अभयारण्यात*



मनाच्या तळ्या भोवती

कल्पनेच्या सुंदर जगात

पक्षी रुपी असंख्य शब्दांचे 

अभयारण्य तयार होतात



शब्द रुपी पक्ष्यांचे थवे

अवतरतात ओळी बनून

रंग छटांनी बनवतात

काव्य प्रेरणा होऊन


विचारांच्या दुर्बीणीतून

बघतो शब्दांचे रंग

काव्य मंचावर चढून

होतो प्रेमाने दंग


झेपावत शब्द रुपी पक्षी 

भावनांच्या विशाल नभी

मोहक सप्तरंगी शब्दांच्या 

अभयारण्यात विहरतो कवी


©ॐप्रकाश शर्मा

No comments:

Post a Comment

Thanks for the comments

माझी शब्द फुले

आर्त साद

 आर्त साद सांग मनात काय आहे तुझ्या प्रेमाच्या दोन शब्दात कळु दे तुझ्या मनातल्या भावना अलगद हृदयापर्यंत आमच्या पोहोचु दे सून म्हणून जरी आलीस ...