*डायरी २३*
मनोहर असे क्षण काही
अनुभवले पुर्ण वर्षभर
रंगवली भरभरून स्वप्ने
सुरेख डायरीत पानभर
शब्दांचे फुलपाखरू
भिरभिरले पानोपानी
अक्षर मोती अवतरले
मनाच्या अथांग सागरातूनी
भाव विश्वाच्या माती मधूनी
अंकुरले विचार सोनेरी
विहरले पक्षी गगनी
घेऊन नव्याने उत्तुंग भरारी
कधी सुख दुःखाच्या
चटक्यांचा झाला मारा
अश्रूंना झेलूनी पृष्ठांवर
केला दुःखाचा सण साजरा
सन्मानासवे मिळाली कधी
कौतुकाची थाप पाठीवरी
भरून आलेल्या भावनांनी
डायरीची पाने राहिली कोरी
सिंहावलोकनात बघता
बरेच अनुभव सुखावणारे
आले गेले प्रसंग बहुतेरे
सांडुन गेले आठवणींचे पसारे
पुन्हा जोशाने भरू या
जीवनाच्या डायरीची पाने कोरी
सार्थक करण्या आयुष्य
घेवूया उंच उंच भरारी
*ओमप्रकाश शर्मा*
No comments:
Post a Comment
Thanks for the comments