लग्न
लग्न असते दोन शरीर
एक आत्मा होण्याची प्रक्रिया
लग्न असते दोन चाके
एक रथ हाकण्याची क्रिया
लग्न असते दोन परिवार
एक नाते गुंफूण्याचा फुलोरा
लग्न असते दोन खांबांवर
एक उभा होणारा डोलारा
लग्न असते दोन शब्द
एक होणारे स्पंदन पद्य
लग्न असते दोन वाक्ये
एक शृंगारिक सुंदर गद्य
लग्न असते दोन जीव
एक उभा राहणारा संसार
लग्न असते दोन तारुण्याच्या
एक धुंद मदमस्त शृंगार
लग्न असते दोन व्यक्तींच्या
एका नव्या युगाचा प्रारंभ
लग्न असते दोन सुर ताल
एक नव्या संगीताचा आरंभ
लग्न असते एकमेकांना समजून उभा विश्वास
लग्न असते एकमेकांशी
जुळलेला श्वासात श्वास
लग्न असतो एक झोका अनुभव देणारा आनंदाचा
झोक्यावर मस्तीत हवेसंग
डोलत प्रणव रस प्राशनाचा
No comments:
Post a Comment
Thanks for the comments