अष्टाक्षरी काव्य
राधा राधा
राधा राधा एक भाषा
अलौकिक आयुष्याची
जीवन संगीत खास
अनुभुती जगण्याची
राधा राधा एक ताल
स्वर्गासम आनंदाचा
डोलणाऱ्या छान छान
मनातल्या भावनांचा
राधा राधा एक रंग
कृष्णाच्या मोर पंखांचा
आसमंतात भरून
धुंद वातावरणाचा
राधा राधा एक सूर
भावपूर्ण बासुरीचा
संपुर्ण चराचरात
भरलेला चैतन्याचा
राधा राधा एक भक्ती
जीवन समर्पणाची
तनमनधन अर्पण
माधवाच्या चरणांची
राधा राधा एक बोल
अहम संपवण्याचा
निर्विकार मनातील
गोड ध्वनी स्पंदनाचा
राधा राधा एक शक्ती
गोड ती बरसानाची
अविरत अशी ऊर्जा
ह्या जागृत संसाराची
राधे राधे
ReplyDelete